Wednesday, 4 June 2014

पॅशन

 त्यानं कथा संपवून शेवटचं 'समाप्त' टाईप केलं आणि खुशीत कडकडून आळस दिला!
हाताची बोटं कटाकट मोडली… मान डावी उजवीकडे वाकवली आणि कथेकडे एक नजर टाकली. 
छान जमली होती कथा… या वेळचं त्यांच्या ऑनलाइन सायन्स -फिक्शन कट्ट्याचं चॅलेंज होतं "लाल रंग"… 
काय काय टाकलं होतं त्यानं कथेत: मर्लॉट वाइन, रासबेरी आईस्क्रीम, व्हॅलन्टाइन डे, ठिबकणारं रक्त आणि बरंच काय काय!

मनासारखं लिहून झाल्यावर त्याला नेहमीप्रमाणे सह-कट्टेकरी आणि खास दोस्त प्रसन्ना करंदीकरची आठवण आली आणि त्यानं फोन लावला,

"अरे पैलवान आहेस कुठे? गायबच झालास तू तर!"

"अरे इकडे मालवणच्या आतल्या भागात नेटवर्क नाय मिळत. पण एक मस्त सुमसाम पठार शोधलंय… कुडाळपासून १६ किलोमीटरवर! आपली लोकं पुढच्या वेळी लॅन्ड करतील तेव्हा त्यांना उतरायला आयडियल जागा आहे. तुझं काय चाललंय?"

"आत्ताच आपल्या या वेळच्या चॅलेंजची कथा लिहिली, लाल रंगावर!"

"आईल्ला भारी आहेस तू तर… मी तर यावेळचं चॅलेंज पास ओव्हर करायच्या विचारात होतो. आपली कंडीशन कळली तर कट्ट्यावरच्या लोकांना संशय येईल रे!"

"मी पण पास ओव्हरच करणार होतो पण मग विचार केला प्रयत्न तर करूया!
शिवाय ही कंडीशन इकडच्या पण १ टक्के पुरुषांत असते. तेव्हा फक्त प्रोटॅनोपिया असला म्हणून लगेच काही पकडले नाही जात आपण!
पण खरं सांगू का, या लोकांमध्ये 'पॅशन'  हा काहीतरी भन्नाट कन्सेप्ट आहे रे. 
तो अनुभवायचा होता ,मला या कथेच्या निमित्ताने."

"हे पॅशन काय असतं?"

"अरे देहाची, निसर्गाची, परिस्थितीची साथ नसताना सुद्धा कधी कधी अचाट कामं करतात ही लोकं केवळ एखाद्या गोष्टीच्या-माणसाच्या प्रेमापायी! 
माझा नवीन मित्र झालाय जग्गू, त्याची बायको प्युअर व्हेज आहे पण फर्स्ट क्लास नॉन वेज जेवण बनवते 
जग्गुला आवडतं म्हणून… चव सुद्धा न घेता!
कालच एका ठिकाणी कर्ण बधीर मुलांचा नाच बघायला गेलो होतो… काय सुंदर नाचत होती रे ती पोरं!
एक बीट चुकत नव्हता त्यांचा!
आजसुद्धा पेपर मध्ये बातमी आलीये राजाभाऊ साळुंकेनी प्रोस्थेटिक लेगवर एव्हरेस्ट सर केल्याची!
कधी कधी वाटतं ना आपल्या 'करंदी' ग्रहावर सगळं खूप जास्तच रॅशनल आहे… अति लॉजिकल!
आपल्या 'शक्यन्त्रा'ने ७० टक्क्यांपेक्षा जास्त यशाचा अंदाज दिल्याशिवाय आपण कुठलं काम हातात घेतलच नाहीय गेली काहीशे वर्षं.
एव्हढी प्रगती करून सुद्धा म्हणूनच आपला ग्रह संपत चाललाय कदाचित!
इकडची माणसं बघ भांडतात, हेवेदावे करतात, चुकतात, पडतात पण आय थिंक हा पॅशन त्यांना तगवेल, पुढे घेऊन जाईल!"

"आयला तू तर ह्या ग्रहाचा फॅनच झालायस, आडनावसुद्धा अगदी बरोबर घेतलयस: अर्थ - आर्थे - आर्ते!"

"हाहा हा, हो ना आणि तू आपल्या मातृग्रहाचं 'करंदीच'च आडनाव ठेवलयस!
पण सिरीयसली तू सुद्धा ट्राय कर "लाल" वर कथा लिहायची… रेफरन्सेस तर काय मित्रांशी गप्पा मारल्या तरी मिळतात हवे तितके. आणि नेटोबा आहेच!"

"यस बॉस ट्राय करतो नक्की! 
शिवाय दोन तीन महिन्यांत या नवीन पठारावर आपलं रसद यान येईल तेव्हा आर्टीफिशियल 'एल' कोन्स मागवतो. टाकून देऊया रेटिनामध्ये हाय काय नाय काय!
चल ठेवतो फोन…संडासचा नळ थरथरतोय करंदीवरून मेसेज येतोय! "

"बाय…वन्दे करंदी!"

नीलनं फोन ठेवला आणि परत आळस देत गॅलरीत नजर टाकली,
भण्ण उन्हात फुललेला काळाशार  गुलमोहर त्याच्याकडे बघून हसत होता!

-नील आर्ते 












Saturday, 29 March 2014

सपना टॉकीज :२

मंगळवारी :
सकाळपासूनच आज नभचा मूड मस्त होता.  साहेब चक्क वीस मिनटं लवकर उठले होते!
लंचसुद्धा आज त्याला 'माणसांच्या' वेळेत करायला मिळाला… आणि बेस्ट पार्ट म्हणजे हरमन आणि मनालीच्या टेबलावर त्याला बसायला मिळालं.
फुल्ल 'दिपिका स्टाइल' वन सायडेड सैल शेपट्यात हरमन खूप गोड दिसत होती आज!

त्यानं ऐटीत स्वत:चा टिफिन-बॉक्स उघडला, नाटकीपणे आतली अदृश्य चिठी काढली आणि डोळे मिचकावत तो म्हणाला, "डीअर इला…!"

हरमन खळाळून हसली आणि त्याच्या छातीत बुगूबुगू झालं!
"फायनली बघितलास वाटते तू लंच-बॉक्स?"

"यस्स बॉस काय मस्त आहे यार, इरफान खान आणि निम्रत कौर दोघंही टू गुड… "
"आणि नवाजुद्दिन पण कसला आहे ना?" हरमन चिवचिवली!

"हो ना शेखचा रोल ढासू केलाय त्यानं… "हेल्लो स sssss र" कसं बोलतो ना तो?
पण सगळ्यात भारी शेवटचा ट्विस्ट!
म्हणजे इला भविष्यकाळातली असते आणि अवकाश-काळाच्या घडीने त्यांचे डबे क्रॉस होतात वगैरे मस्तच!"

पुढे बराच वेळ फक्त नभ बोलत राह्यला आणि हरमन - मनाली अस्वस्थपणे चुळबुळत राह्यल्या!

Wednesday, 26 March 2014

सपना टॉकीज १:

 "लो sss डार्लिंग…"

"गाढवाच्या X%#त घाल तुझं डार्लिंग… आम्ही काय चुत्या आहे काय रे एकसारखा तुला फोन करायला?
भोसडीच्या परत तुला मेलो तरी फोन करणार नाय."

"मेलास तर कसा फोन करशील राजा? इट्स बायोलॉजीकली इम्पॉसिबल!", नभला हसू फुटलं…,
"अरे तिरकू असा काय रागावतो खूप बिझी होतो यार."

"हो ना तू बिझी अगदी मनमोहन सिंगपेक्षा आणि आम्ही इकडे बेकार बसलोय आम्हाला काय कामंच नायत!"

"सॉरी सॉरी सॉरी राजा असा काय मुलींसारखा रुसतो… बोल ना"

तिरक्या थोडा निवला होता… आता नुसताच गुरगुरत होता!
नभूनी ओळखलं साहेबांचा राग शांत व्हायच्या मार्गावर आहे…फायनली!

"काही नाही काल 'लंच-बॉक्स' बघितला… कसला पिक्चर आहे छोट्टे!"

"नभू परत हळहळला, 'नाही यार वेळच नाय मिळाला", आणि त्यानं घाबरून जीभ चावली!

तिरक्या परत उसळला, "अबे तू स्वत:ला खरंच मनमोहन सिंग किंवा केजरीवाल समजतो काय रे? आम्ही काय लल्लू पंजू बसलोय काय इथे? पुण्याला जाऊन जास्तच शाणा झालायस! चांगला पिक्चर वेळात वेळ काढून बघायचा असतो कळ्ळ ना? तुला पिक्चरचं वेड आहे म्हणून सांगतोय."

Thursday, 5 December 2013

झगार्ड ५:

 रोबर एका आठवड्याने. वेळ रात्रीचे अकरा! ठिकाण हरिश्चंद्र गड!

 देशपांडे आणि उल्काताईनी दगडांच्या चुलीवर बनवलेली मस्त खिचडी खाऊन घेतली आणि ते दोघं गुहेबाहेर पडले. डिसेंबरची रात्र असूनही फारशी थंडी नव्हती तरी देशपांडेनी उल्काताईंना एक शाल घ्यायलाच लावली होती!
मधलाच वार असल्यामुळे ट्रेकर्सची गडबड नव्हती आणि समोरचा माळ मोकळा-ठक्क होता!
समोरच्या मंदिराचे कळस अंधारात अंधुक दिसत होते…मागे तारामतीचा डोंगर निश्चल उभा होता काळा सफारी घातलेल्या अबोल बॉडीगार्ड सारखा.
दोघं केव्ह बाहेर पडून माळाच्या दिशेन चालायला लागले आणि अचानक अंधारातून जोमन अवतीर्ण झाला.
उल्काताई जवळपास किंचाळल्याच होत्या पण देशपांडेनी त्यांना सावरलं.
'ओके उल्काताई ही तुमची कॅप्सुल आत्ता गिळून टाका, साधारण एका तासात तुम्ही रिलॅक्स्ड आणि आनन्दी झालात की झगार्ड ट्रिगर होईल. ती स्टेट तुमच्यासाठी सहा सात तास तरी राहील म्हणजे सकाळ पर्यंत'

'पण समजा अर्ध्या तासात मी घसरले आणि माझा पाय मुरगळला किंवा मला उचकी लागली तर तो क्षण ताणला जाईल म्हणजे मी सकाळ पर्यंत तळमळत किंवा उचक्या देत बसेन का?'
उल्काताईनी बराच वेळ त्यांना कुरतडणारी शंका विचारली.

जोमननं त्याचं ठेवणीतलं हसू काढत नकारार्थी मान हलवली,
"तसं कधीच होणार नाही कारण ही झगार्ड टेक्नॉलॉजी एखाद्या व्हॉल्वसारखी आहे म्हणजे तुमच्या मेंदूतल्या डोपामाईनच्या पातळीत वाढ झाली किंवा रिवार्ड सेंटर मध्ये हालचाल वाढली तरच ते ट्रिगर होईल, तुम्ही अस्वस्थ किंवा वेदनेत असलात तर ते ट्रिगर होणारच नाही… आणि तुमच्या डोक्यावर लावलेल्या या छोट्या चीप द्वारे आम्ही मॉनिटर करूच तुम्हाला… शिवाय…" जोमन थोडा अडखळला , "तुमच्या ट्युमरमुळे आम्ही विशेष काळजी घेतलीये आणि म्हणूनच मी स्वतःही हजर आहेच सो एन्जॉय, खगोल खात्याच्या परवाच्या रिपोर्टप्रमाणे साधारण बारा वाजता उल्कावर्षाव चालू होईल,
आम्ही तिकडे लांब टेण्ट लावलाय म्हणजे उगीच कबाब मे  हड्डी नको पण काहीही लागलं तर देशपांडे सर नुसता शाउट द्या!
आमची आक्खी टीम तुमचा झगार्ड मोमेंट जास्तीत जास्त सुंदर करण्यासाठी कटिबद्ध आहे!"
इथं तो फिल्मी  स्टायलीत कमरेत झुकला!
"चला नाऊ आय 'ल लिव्ह यु टू लव्ह बर्ड्स अलोन"

आणि तो आला तसाच अंतर्धान झाला!

उल्काताईनी कॅप्सुल गिळून टाकली मग ते दोघं आणखी थोडं पुढे माळावर चालत गेले आणि एक मोकळी जागा बघून दोघांनी बैठक मारली.

देशपांडेनी उल्काताईंना हलकेच कोपराने ढोसलं, 'वर बघ'.

आख्खं आकाश ताऱ्यांनी खचाखच भरलं होतं आणि स्वछ हवेमुळे की गडाच्या उंचीमुळे कोण जाणे पण आभाळाचा घुमट खूप खाली आल्यासारखा वाटत होता. जिकडे नजर पोचेल तिकडे तारे लखलखत होते.

उल्काताईनी अलगद देशपांडेंचा हात हातात घेतला , 'थॅन्क्स अशू!'
देशपांडेनी उल्काताईंच डोकं जवळ घेतलं आणि खोल हुंगलं… त्यांच्या रुपेरी रेशमी केसांना सुकवलेल्या संत्र्याच्या सालींचा आणि रिठा-शिकेकाइचा तो मंद चिरपरिचित  वास येत होता.
'आठवतंय तुला वांगणीच्या आकाशदर्शन कार्यक्रमातच पहिल्यांदा भेटलो होतो आणि सप्तर्षी कोणता यावरून आपलं जोरदार भांडण झालं होतं.'
'हो तू सप्तर्षी म्हणून काहीही दाखवत होतास, जाम भडकले होते मी तुझ्यावर… पण सांगू का तुझं नाव ऐकल्या ऐकल्या मला जाम आवडलं होतं, कधीच ऐकलं नव्हतं मी असं नाव "अशनी" !'

'आणि मालवणच्या तोंडवळी बीच वर झोपून तारे बघताना तू मला प्रपोज केलं होतंस'!
'आणि तू पोरीसारखा चक्क लाजला होतास'

'आणि हिमालयातला तो उल्कावर्षाव आठवतोय हनिमूनचा?'
'हो मग नंतर आतमध्ये मला किस करताना कंदील पाडून टेण्टला जवळ जवळ आग लावली होतीस'

"माहित नाही का ते अशू, पण लहानपणापासून ताऱ्यांनी लखलखणारं आकाश पाहीलं नं की मन शांत शांत होतं.  शांत आणि गार.  मग सगळे जगण्याचे उपद्व्याप लल्लू पप्पू वाटतात म्हणजे कितीही अफलातून टेन्शन असो या अथांग पोकळीपुढे ते छोटुसंच वाटतं, दुसर्या दिवशी सकाळी कोणताही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू असा विश्वास वाटतो.... तशी थोडी भीती वाटतेय मला परवाच्या ऑपरेशनची पण आत जायच्या आधी मी हे आकाश आठवीन ओके?"

अशनीनं उल्काला जवळ घेतलं, आणि वर बोट केलं:
उत्तरेकडून सणसणत एक तारा (खरं तर उल्का ) आला आणि तेजाळ शेपूट दाखवत नैऋत्येला अंतर्धान पावला.
उल्कानी एक फ्लायिंग कीस फेकला त्या आकाशस्थ उल्केकडे आणि खरा किस आपल्या नवऱ्याकडे…
तेवढ्यात अजून एक तारा पडला मग सटासट दोन लागोपाठ आले आणि  ते चक्क थोडे हिरवट रंगाचे होते… वितळवलेल्या पाचून्सारखे.…
आणि मग वर्षावच चालू झाला तेजाळ उल्कांचा त्यात काही पिवळ्या होत्या काही लायलॅक आणि मग तीन पाठोपाठ आल्या टरकॉइझ रंगाच्या…
आणि अशनीनं मोबाईलवर 'इनक्सस'चं 'आफ्टर-ग्लो' लावलं!

Touch me and I will follow in your afterglow
Heal me from all this sorrow
As I let you go I will find my way when I see your eyes
Now I'm living in your afterglow
…………

ते जीवाला गार गार करणारं खच्च भरलेलं आकाश, इकडून तिकडे सटासट पडणारे ते हिरे माणकांसारखे तारे… आणि 'आफ्टर-ग्लो' चे ते जीवघेणे सूर…उल्काला ह्या इतक्या आनंदाने घुसमटायलाच झालं!

Here I am, lost in the ashes of time, but who wants tomorrow?
In between the longing to hold you again
I'm caught in your shadow, I'm losing control
My mind drifts away, we only have today
…………

ती अशनीला बिलगली आणि तिच्या डोक्यावरचा लाल दिवा लुकलुकू लागला.

Bathed in blue, the walls of my memory divide the thorns from the roses
It's you who is closest

उपसंहार:
लोकसत्तेतील पाचव्या पानावरील २ बातम्या :

१. ढगाळ आकाशामुळे हौशी आकाश-निरीक्षकांची  निराशा :
 परवाचा दुर्मिळ असा लिओनिड तारका-पुंजातील उल्का वर्षाव महाराष्ट्रात ढगाळ हवामानामुळे नीट दिसू शकला नाही. विशाखापट्टणम जवळील समुद्रात झालेल्या 'गाटुंमा' चक्रीवादळाचा हा परिणाम असून अजून दोन दिवस मुंबई, ठाणे, पुणे, नगर व बहुतांश इतर जिल्ह्यांत आकाश ढगाळच राहील.

२. मुंबई आय आय टीच्या थ्री डी होलोग्राफिक मॉडेलला प्रथम पारितोषिक:
कालच्या आय. आय. टी. टेक-फेस्टच्या "मय-सभा " इव्हेंट मध्ये मुंबई आय. आय. टी. टीमच्या "चांदण्यांनी भरलेलं आकाश आणि उल्कावर्षाव" या प्रेझेन्टेशनला प्रथम पारितोषिक मिळाले असून
विजेत्या संघाला हंगेरी येथे होणाऱ्या जागतिक थ्री डी इमेजिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायची संधी मिळेल.
विजेत्या संघातील विद्यार्थ्यांची पूर्ण नावे पुढीलप्रमाणे :

          लेमी डाल्टन परेरा
          बल्लाळ सुनिता सोनावणे
          विभ्रम जोमन शेणॉय (संघनायक)

************************ समाप्त ************************

टीप : इंग्रजी गाण्याच्या ओळी INXS या रॉक बॅंडच्या AFTERGLOW या अप्रतिम गाण्यातील आहेत
-नील आर्ते

Monday, 2 December 2013

झगार्ड ४:

 देशपांडेनी दबकतच झगार्डच्या टुमदार बैठ्या ऑफिसात प्रवेश केला.
समोरच एक चटपटीत रिसेप्शनिस्ट बसली होती, तिनं एक दिलखुष स्माईल देशपांडेंकडे फेकलं आणि विचारलं, 'सरांना भेटायचं ना झगार्ड पॅकेजसाठी? दोन मिनटं बसा ना… सर येतीलच!"
समोरच खाउन टाकाव्याश्या वाटणाऱ्या कॅन्डी रेड रंगाचा सोफा होता. त्यात देशपांडे बसले आणि त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली…छान प्रसन्न फील देत होतं ते ऑफिस!
सगळी सजावट एकदम 'क्लासी' होती. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत होती समोरच्या केबिनच्या दारावरची मोठ्ठी फ्रेम, तिच्यावर लिहिलं होतं:

"जीवनात ही घडी अशीच राहू दे... प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे"

'बाबांचं आवडतं गाणं होतं हे… कोणता बरं पिक्चर???' देशपांडे स्मरण शक्तीला ताण देऊ लागले,

"पिक्चर 'कामापुरता मामा' गीतकार-संगीतकार यशवंत देव आणि गायिका लता मंगेशकर",
बाजूला अलगद येउन उभा राहिलेला तो माणूस बोलला!
देशपांडे थोडे दचकलेच!
''रिलॅक्स सर… मी जोमन शेणॉय… ह्या आमच्या छोट्याश्या कंपनीचा, झगार्डचा ओनर कम सी. इ. ओ.!", तो मिस्कील हसत बोलला.
मस्त माणूस होता तो… छोटूसाच पण रेखीव, लहान मुलासारखे लुकलुक डोळे असलेला, त्यात त्यानं थेट साल्वादोर दालीसारख्या अक्कडबाज मिशा ठेवल्या होत्या… त्यामुळे तो थोडासा ती अ‍ॅडमधली ती मोठ्या माणसाचा वेष केलेली मुलं असतात ना तसा दिसत होता.

'या ना सर आपण माझ्या केबिनमध्ये बसून बोलू आरामात', दोघं त्याच्या केबिनमध्ये शिरले.
"बसा नं सर आरामात, आधी मी तुम्हाला एक छोटंसं ब्रीफिंग देतो, आमच्या कंपनीची बॅकग्राउन्ड आणि कामाची पध्दत तुम्हाला सांगतो… कसं आहे ना क्लायेंटला विश्वासात घेणं कधीही उत्तम काय?

तर साधारण पन्नास वर्षांपूर्वी एकूण लोकसंख्येच्या काही टक्के लोक सायको-अ‍ॅक्टिव्ह ड्रग्ज घ्यायचे: कोकेन, क्रिस्टल मेथ, एल. एस. डी. वगैरे… त्यातल्या बऱ्याच लोकांना नशेत असताना वेळ मंदावल्यासारखा वाटायचा
उदाहरणार्थ फक्त शू ला जाऊन यायला तासभर लागायचा किंवा पार्टीची रात्र तीन चार दिवस सलग चालल्यासारखी वाटायची…किंवा नशा न करणाऱ्या लोकांनासुद्धा कधी कधी स्वप्नात खूप वेळ गेल्यासारखा वाटतोच ना पण डुलकी फक्त तासभराची लागलेली असते!
थोडक्यात काय तर घड्याळ वगैरे ठीक आहे पण घड्याळ नसताना माझं 'झटकन' आणि तुमचं 'झटकन' वेगवेगळं असू शकतं. हे शास्त्रज्ञांना बरच आधी कळलं होतं.
पण कोणती रसायनं आपल्या मेंदूच्या काळ मापण्याच्या प्रणालीवर किती आणि कसा परिणाम करतात याचा अचूक अंदाज यायला शास्त्रज्ञांना २०३० साल उजाडावं लागलं!
आणि याचाच रिझल्ट म्हणजे आमची खास पेटंटेड…" , इथं जोमननं एक नाटकी पॉज घेतला,
 "जीवनात ही घडी अशीच राहू दे उर्फ जे. एच. जी. ए. आर. डी. उर्फ झगार्ड ट्रीटमेंट!"

जोमनचे लुकलुक डोळे अजूनच चमकायला लागले होते,
"म्हणजे आपल्या ताणतणाव कटकटीच्या आयुष्यात आनंदानं थुइथुइ करणारे म्हणा, निवांत म्हणा किंवा तृप्त करणारे म्हणा क्षण फार कमीच असतात, आणि आपल्यातल्या प्रत्येकाला कधी ना कधी वाटून गेलेलं असतं की हाच क्षण अमर होऊन जावा… काहीच नसावं याच्या मागे नी पुढे!"
म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीची मिठी, स्पर्धेत मिळालेलं मेडल, रॉक क्लाईम्बिंग करताना भरून आलेलं अ‍ॅड्रेनिलीन, ऑरगॅजमचा तो उत्कट क्षण किंवा वडापावच्या घासावरचा चहाचा तो गरम घोट… त्या क्षणातच रहाता आलं तर आपल्याला थोडा जास्त वेळ? म्हणजे तासभर? किंवा रात्रभर??
आणि नेमकी हीच सर्व्हिस पुरवतो आम्ही ती सुद्धा ड्रग्जच्या दुष्परिणामांशिवाय."

जोमननं पुन्हा फिल्मी स्टाइलमध्ये मान तुकवली, "बोला तुम्हाला कोणतं पॅकेज देऊ?"

क्रमश:

Friday, 29 November 2013

झगार्ड ३:

 त्यानं झटपट लॉग ऑफ केलं आणि तो निघाला. फक्त सहा वाजले होते. संध्याकाळचा गुलाबी प्रकाश हळूहळू जांभळा होत होता पण रस्त्यावर अजून बऱ्यापैकी उजेड होता. आज चक्क दिवसाउजेडी तो कामावरून सुटला होता.
धिस वॉज अ मोमेंट टु बी चेरीश्ड! तो समोरच्या मावशीच्या गाडीवर गेला आणि त्यानं स्टीलच्या ग्लासातनं पाणी घेऊन ती सोनेरी कॅप्सुल गिळून टाकली!
'मावशी एक वडा पाव आणि कटिंग द्या… थांबा वडे गरम काढताय ना दोन्ही एकदमच द्या मग!'

मावशींनी एक हिरवट पांढरा गोळा घेतला त्याला चण्याच्या पातळ पिठाची "शंभो" केली आणि तो अलगद कढईत सोडला… मग दुसरा… मग तिसरा… ….
ते चुर्र चुर्र करत, मस्तीखोर पोरांसारखे एकमेकांना इकडे तिकडे ढकलत कढईत सेटल झाले!
त्यांच्या आजूबाजूला ते फुर्र फुर्र करणारे तेलाचे बुडबुडे!
हळूहळू ते पिवळे गोळे सोनेरी झाले… मग मावशींनी अलगद तेल निथळलं आणि त्या सगळ्यांना एक पलटी दिली!
मग बस्स दोनच मिनटांत ते थाळीत पडले.
त्यानं त्याचा वडा कढईत  असतानाच हेरून ठेवला होता... चार वेडीवाकडी कुरकुरीत नाकं फुटलेला मॉडर्न-आर्ट  मधल्या चेहेऱ्यासारखा तो वडा! त्यानं त्याच्यावर बोट ठेवलं आणि मावशीनं हसून मान डोलावली.
तिची पातळ सुरी पावामधून हलेकच फिरली आणि पावाचे बुडाशी जोडलेले दोन भाग झाले, आधी चिंच-गुळाची गोड चटणी मग हिरवी ओली चटणी आणि वर भुरभूरवलेलं लाल तिखट!
पर्रर्र्रफेक्ट त्याला हवं तितकच कमी नाही की जास्त नाही…
मग कुरकुर नाकवाले वडेबुवा अलगद पावात घुसले!
मावशीनं तो वडापाव त्याला हॅन्डओव्हर करता करताच निन्जाच्या चपळाईनं दुसऱ्या हातानं कटिंग ओतली!
तिही त्यानं ताब्यात घेतली आणि एक दिलखुष नजर सभोवार फिरवली…
संध्याकाळची वेळ, लोकांची लगबग, समोरून चाललेल्या सिम्बायोसिसच्या दोन छान मुली… सगळं त्यानं डोळ्यात भरून घेतलं आणि वडापावचा एक लचका तोडला; तोंड थोडं उघडंच ठेवून त्यानं बटाट्याची वाफ बाहेर जाऊ दिली आणि मग गरमपणाचा अंदाज घेत हलकेच तो घास चावला… एका कुरकुरीत नाकासकट!
तोंडात घास न गिळता तसाच ठेवत त्यानं कटिंगचा घोट मारला आणि आलंवाला तो कमी गोड चहा घासाच्या आसपास आणि आत पसरला!
'हेवन जस्ट हेवन!'
त्याच्या डोक्यावरचा लाल दिवा लुकलुकू लागला आणि तो स्टूलावर बसत स्तब्ध झाला.

क्रमश:

Thursday, 28 November 2013

झगार्ड २:

  दोघांनी मिळून वाईनची अख्खी बाटली पार केली होती… आणि नंतर झक्कास जेवण! शेवटी तिरामिस्सुचा चमचा त्यानं तिला भरवला आणि गालावर हलकेच ओठ टेकत ती सोनेरी कॅप्सुल तिच्या ओलसर जिभेवर ठेवली.
'हे तुझं बर्थ डे प्रेझेंट!' तो डोळे मिचकावत बोलला.
'वाव्व झगार्ड!' ती चित्कारली. ,'पण टायमिंग जुळणार बरोबर? शिवाय कित्ती महाग असतं  ते?…एवढा खर्च करायची काय गरज होती रे??'
त्यानं तिला जवळ ओढली आणि तो तिच्या कानात पुटपुटला, 'तुझा  प्रॉब्लेम माहितीय काय आहे? तू खूप जास्त प्रश्न विचारतेस!'…. पुटपुटतानाच त्यानं तिच्या कानाची पाळी हलकेच चावायला सुरुवात केली होती.
ती सित्कारली आणि तिन त्याचं डोकं केस पकडून आपल्या वक्षात दाबलं!
त्यानं तिचा एक झकास कीस घेतला मग तिनं त्याचा… मग परत त्यानं, तिच्या नाकाचे, डोळ्यांचे, कानाचे… खालच्या ओठाचे, वरच्या ओठाचे, वक्षांचे आणि बेंबीचे, मांड्यांचे  आणि मांड्यांमधले शंभर हजार एक लाख किसेस!!!

हलकेच त्यांनी एकमेकांचे कपडे उतरवले… तिनं त्याची आवडती फुश्चिया कलरची ब्रा घातली होती आणि त्यानं तिची आवडती 'डिझेल'ची डार्क ग्रीन ब्रीफ!
बराच वेळ ते शोधत राहिले एकमेकांचे कोपरे,खळगे आणि उंचवटे…मांसल आणि उष्ण!
मग तो तिच्यात शिरला अन ती हलकेच कण्हली… तिचे डोळे जडावले होते… किती तरी वेळ दोघं लयीत हलत होती आणि मग तिच्या मांड्यात सुखाचा स्फोट झाला… मांड्यान्तून पोटात छातीत आणि मेंदूत!

शरीर ह ssssss लकं झालं आणि तिच्या डोक्यावरचा लाल दिवा लुकलुकू लागला.
ती स्तब्ध झाली होती… त्यानं हलकेच तिच्या कपाळाच चुंबन घेतलं, तिच्या अंगावर चादर ओढली आणि तिला कुशीत घेऊन तो झोपून गेला.

क्रमश: