त्याचे डोळे गिल्टी प्लेझरनी चमकत होते,
समोर पडलेल्या देहातील निर्जीव डोळे धुरकट काचेसारखे दिसत होते.
त्याने अजून सटासट घाव घालून त्याचे बारीक तुकडे केले ..रक्त थिजलेल होतं पण एक ओघळ चाकूवर आलाच.
त्याने ओलसर ओठांवरून जीभ फिरवीत आजूबाजूला बघितलं ..सगळा पुरावा बेमालूम नष्ट करायला हवा होता.
तो पकडला गेला असता तर वाट लागली असती.
सगळी सोसायटी फक्त व्हेज लोकांसाठी होती ..मासा तळण्यापेक्षा कालवण केल्यास वास फारसा बाहेर गेला नसता!
-नील आर्ते
-नील आर्ते
थरारक .......!!
ReplyDeleteमस्त! हे 55 word fiction चे मराठी अवतार सही आहेत!
ReplyDeletehihi haha 3:)
ReplyDelete