उन्हाळ्यातली प्रसन्न सकाळ!
सकाळी ८ वाजता पुण्यातल्या त्या छोट्याश्या सार्वजनिक बागेत अजूनही सुखद गारवा होता.
बहावा पिवळाधम्मक फुलला होता ...
माळ्याने निगुतीने लावलेला कवठी चाफा, पहाटे पडलेला प्राजक्ताचा सडा, वेडं बकुळीचं झाड,
आणि पाचोळ्याच्या शेकोटीचा धूर या सगळ्याचा मिश्र धुंद वास भरून राहिला होता.
आणि पाचोळ्याच्या शेकोटीचा धूर या सगळ्याचा मिश्र धुंद वास भरून राहिला होता.
बागेतील एका शांत कोपऱ्यात खुशीत त्याने सगळा वास छातीत भरून घ्यायची तयारी केली ...
आणि व्हाईटनरची बाटली परत नाकाला लावली!
-नील आर्ते
No comments:
Post a Comment