Sunday, 30 October 2011

ज बऱ्याच वर्षांनी 'तो' झिपमध्ये अडकला आणि बऱ्याच वर्षांनी ब्रम्हांड आठवलं!
लहानपणी 'तो' अडकलेला तेव्हा बाबा मदतीला आलेले.

आता बाबा नाहीत पण ब्रम्हांड मात्र आठवलंच.
डोळ्यांत टचकन पाणीच आलं...नव्हे बाबांच्या आठवणीने नव्हे...खूप झोंबल्यामुळे.
बाबांच्या आठवणीने रडू कधीच येत नाही....छातीत दुखतं मात्र खूप!

त्या वेळी बापाने आपल्या पोराला अलगद हळूच संकटातून सोडवलेलं...आणि मग वेदना आणि शरमेनी लाल झालेल्या पोराला दिलखुलास हसून थोपटलेलं.

आता मात्र पोरालाच स्वतःचा बाप होऊन स्वतःची मदत करायला लागली,
स्वतःची आणि स्वतःच्या छोट्या भावाची सुद्धा!

-नील आर्ते

4 comments:

  1. मायला अंडरपॅंट घालायला काय होतं... असा कसा अडकतो झिपमधे?

    रच्याक, अशा वेळी बाबाच लागतात रे... खरंय सालं.

    ReplyDelete
  2. आल्हादा,
    उन्हाळा रे ...जरा 'आल्हाद' वाटतो :D

    ReplyDelete
  3. Hahahahahahahahaha... Bharich Bhawa!!! :D :D :D

    ReplyDelete