Saturday, 15 October 2011

"शनिवारचा" स्टड

प्रिल मधली शनिवार संध्याकाळ, शिवाजी पार्कचं सी सी डी तरुणाईने फुललेलं.
त्याने एन्ट्री टाकली आणि सगळ्या पोरींचं काळीज लक्कन हललं.
ट्रेंडी स्पाईक्स, "जॅक-जोन्स" ची मांडीवर फाटलेली डार्क ब्ल्यू जीन्स आणि "डिझेल"चा तलम स्लीवलेस टी शर्ट.
शिवाय कमरेवर उगीचच स्टायलीत बांधलेला लाल चेक्सचा "स्कॉच एन सोडा"चा फ्लॅनेल शर्ट.  
सव्वा सहा फूट उंची, शिडशिडीत बांधा पण फोर आर्म्स आणि दंडात दिसणारी प्रचंड ताकत.

सी सी डी मधल्या विविध मुली विविध कारणांसाठी तात्काळ त्याच्या प्रेमात पडल्या:

मियाला त्याच्या वाईड नेक टी शर्ट मधून दिसणाऱ्या रुंद  छातीवरला तीन मूर्तींचा एक्झॉटीक टॅटू आवडला,

सुहानीला त्याचे रुसक्या पोरासारखे किंचित फुगलेले गाल खूप क्युट वाटले,

आणि साल्साला आवडली त्याची नजर: एकाच वेळी किंचित रागीट, आश्वासक आणि निरागस, 
चक्क तिला पाहूनही तिच्या "गळ्याखाली" न जाणारी बेदरकार, शांत स्थिर नजर !

सगळ्या मुलींच्या प्रेमळ + त्यांच्या बॉय फ्रेंड्सच्या जळू नजरांना फाट्यावर मारत आपल्याच मस्तीत त्याने एक टेबल पकडलं आणि तो शांतपणे टिश्यू-पेपर्सवर काहीतरी लिहित बसला.

साल्सा तर वेडावली होती, माहित नाही किती वेळ गेला १० सेकंद? ५ मिनटं? की २ तास?

अचानक तो उठला,
हसत दाणदाण पावलं टाकत तो साल्साकडे आला, आणि त्याने तो टिश्यू-पेपर साल्साला दिला. 
साल्सा थुयथुयली, नक्की त्याचा नंबर देत होता तो. 
तिच्या डोक्यावर अलगद प्रेमळ हात ठेवून तो आला तसा परत फिरला आणि निघून गेला.

साल्सानी खुशीत टिश्यू उघडला आणि ती बावचळली अक्खा टिश्यू पेपर राम-नामाने भरला होता, आणि कुठेतरी हनुमान जयंतीची आरती जोरात चालू होती.
-------------------------------------------------


वाचकहो या गोष्टीला खालील श्लोकाचा आधार आहे :
अश्वथामा बळीर्व्यासो हनुमानाश्च  विभिषण कृपाचार्य च परशुरामां सप्तैता चिरांजीवानाम  
अर्थ : अश्वथामा, बळी, व्यास,  हनुमान, विभिषण, कृपाचार्य, आणि परशुराम  हे सात चिरंजीव आहेत.
-नील आर्ते


6 comments:

  1. हाहाहाहा.. सॉ हॉ लि ही ड ह !!

    ReplyDelete
  2. हा हा हा..मस्त मस्त. एक क्षण भंजाळायला झालेलं.
    (अवांतर- स्लीव्हलेस शर्ट? यिक्स बरं. यिक्सच.)

    ReplyDelete
  3. हनुमानाला स्पाईक्स आणि जीन्समध्ये विजुअलाईज करून धन्य धन्य झालो.......आता एखाद्या आर्टिस्टकडून ही आयडिया पेंट करून घेतो व बेडरूमच्या वॉलवर चीपकवतो.....

    भ.....न्नाट

    एक नवीनच कन्सेप्ट डोक्यात टाकलास.....कि रे

    ReplyDelete
  4. सायबा, तुझ्या कल्पनाशक्तीला सलाम !!! टेरिफिक!!

    ReplyDelete