बाबांबरोबर मी लहानपणी बरेचदा ठाण्याला जायचो.... रात्री उशीरा परत येताना सायन वरून उजवीकडे वळलो की खाडीचा तो चिरपरिचित वास नाकात घुसायचा आणि ड्राईव-इनच्या पडद्यावरचा पिक्चर रस्त्यावरूनही दिसायचा...
मग पेंगुळलेल्या मनाला खात्री पटायची की आपण घरी आलोय...वांद्र्यात! आणि उगीचच खूप छान वाटायचं.
बेहराम-पाडा आणि खेरवाडी! सगळं काही आलबेल असलं तरीही दोघांमधला अगदी सू sssssssssss क्ष्म ताण (जो ९२ नंतर कधीच पूर्ण जाऊ शकणार नाही. )
मग पेंगुळलेल्या मनाला खात्री पटायची की आपण घरी आलोय...वांद्र्यात! आणि उगीचच खूप छान वाटायचं.
बेहराम-पाडा आणि खेरवाडी! सगळं काही आलबेल असलं तरीही दोघांमधला अगदी सू sssssssssss क्ष्म ताण (जो ९२ नंतर कधीच पूर्ण जाऊ शकणार नाही. )
खेरवाडीतली २७ नंबरची नवरात्रीतली स्निग्ध नजरेची देखणी देवी, "पास-नापास" मंडळाचा गणपती.
मनोहरकडचे समोसे, ३४ नंबरची भायगिरी.
अमेय मधली कोथिंबीरवडी, हाय-वे गोमंतक मधले स्टीलच्या चकचकीत थाळीतले ताजे फडफडीत सेक्सी फिश फ्राय, बोरकरची उकडलेला बटाटा मिक्स केलेली मिसळ!
एम. आय. जी. क्लबचे ग्राउन्ड, त्याच्यावरचा आजोबा पिंपळ आणि त्यावर हिवाळ्यातल्या कोवळ्या सकाळी बघितलेले बुलबुल, दयाळ, बार्बेट आणि इतर अनेक गॉर्जीअस पक्षी.
गेट जवळचं आंब्याचं उतावळ झाड ज्याला जानेवारी एंड मध्येच इटुकल्या कैऱ्या लागतात.
क्लब मध्ये साजऱ्या केलेल्या एक लाख थर्टी फर्स्ट आणि अंगात आल्यासारखा केलेला डान्स!
दातांचे डॉक्टर डिगीकर, त्यांचे पांढरे शुभ्र केस आणि दात कोरताना चालू असणारी विविध भारतीवरची जुनी भावगीतं.
शांत साहित्य सहवास आणि आतलं फणसाच झाड, त्याला लटकणारी अज्रस्त्र वटवाघळ!
वरती गच्चीवर अभी सावंत बरोबर घासलेलं बी. एस. सी. चं फिजिक्स...
आणि खाली पार्किंगमध्ये त्याचीच वयाच्या सव्वीसाव्या वर्षी निघालेली अंत्ययात्रा!
स्वामी नारायण मंदिरापाठी मिळणाऱ्या "अणुबॉम्ब"च्या बिया, ज्या पाण्यात टाकल्यावर बरोब्बर एक मिनिटांनी ठाप्प करून फुटायच्या.
गुप्ताजी भेळवाला, त्याच्याकडची मऊसूत रगडावाली पाणीपुरी आणि तोंडात टाकल्यावर होणारे तिखट आंबट गोडसर चवींचे स्फोट!
आणि तशाच एक लाख तिखट आंबट गोडसर आठवणी!
तुम्ही एक नोटीस केलंय?
नेहमी "बॅन्ड्रा वेस्ट" असतं आणि "वांद्रे पूर्व" ...
बॅन्ड्रा वेस्ट म्हणजे मीनीज घालणारी फुल्टू फटका बोल्ड मुलगी!
आणि वांद्रे पूर्व म्हणजे तिची सलवार कमीज घालणारी चष्मीस, शांत, पण तितकीच ग्रेसफुल मोठी बहिण!
गुप्ताजी भेळवाला, त्याच्याकडची मऊसूत रगडावाली पाणीपुरी आणि तोंडात टाकल्यावर होणारे तिखट आंबट गोडसर चवींचे स्फोट!
आणि तशाच एक लाख तिखट आंबट गोडसर आठवणी!
तुम्ही एक नोटीस केलंय?
नेहमी "बॅन्ड्रा वेस्ट" असतं आणि "वांद्रे पूर्व" ...
बॅन्ड्रा वेस्ट म्हणजे मीनीज घालणारी फुल्टू फटका बोल्ड मुलगी!
आणि वांद्रे पूर्व म्हणजे तिची सलवार कमीज घालणारी चष्मीस, शांत, पण तितकीच ग्रेसफुल मोठी बहिण!
गव्हर्मेंट कॉलनीत अशा साध्या + चाबूक बहिणींच्या जोड्या खूप होत्या हे कॉलनीतला कोणताही पोरगा मान्य करेल ;)
अर्थातच खूप खूप लवकर : गव्हर्मेंट कॉलनी!!!
-नील आर्ते
Nil your Mumbai posts are calling me back more than "Swades" In fact this one is DA best and my only connection to वांद्रे पूर्व is BKC.....
ReplyDeleteThis is really a nice post...keep writing....:)
@:Aparna It acttually happens to me : Suddenly anytime anywhere I get random flashes about Mumbai Places in front of my eyes ..Citilight ka chowk , SP cha katta, Linking road, Eastern express highway varacha Vikrolicha Godrejcha Jungle patta , Vasheechee Khad, Mulundchya by lanes, Thanaycha talav ..kahihee
ReplyDeleteDoes it happen to yall ??
I guess ya!!!
Thanks for everything & Mumbai is missing u too !!!
It does happen at least to me mate....and I think that's probly the reason why I read your Mumbai collage often n then miss my Mumbai so much...
ReplyDeleteYou know what I really liked the way you ended your response....:)
@Aparna as they say "U can take lady outta Mumbai but can not take Mumbai outta lady"!!!
ReplyDeleteही कमेंट ’गव्हर्नमेंट कॉलनी-१’ वरची आहे. तिथे कमेंट पोस्ट करता येत नाहीयेत. चेक कर.
ReplyDeleteतिथली बाकी सारी व्होकॅब परिचित आहे पण आडी=प्रेयसी?? हा हा!
पहिल्यांदा "काहीही!" असं वाटलं पण नंतर काहीतरी क्लिक झालं. तुला माहितेय का कथ्थकमध्ये विलंबित, म्ध्य आणि द्रुत असे तीन ताल असतात (लई शाईन मारायची तर अतिदृत) तर या लयींना थोडंसं लंगडं केलं की होते ’आडी’, ’बिआडी’ आणि ’कुआडी’. चार मात्रांऐवजी तीनच मात्रा मारुन मुटकून बसव, आठ ऐवजी सातच कर असा काहीतरी तिरपागडा प्रकार चालतो. तुला हे सगळं डोक्यावरुन जात असणार याची कल्पना आहे. तर सांगायचा मुद्दा फ़क्त एव्हढा आहे की ’नॉर्मल’ मैत्रीणींपेक्षा प्रेयसी काहीशी अशाच प्रकारे वेगळी असते (माझ्या मते). वरवर कितीही वाह्यात, निरर्थक वाटणारया शब्दामागे कधीकधी किती मोठा गर्भितार्थ दडलेला असतो.
पेल्टोफ़ोरम मस्त. बहाव्यानंतरचं माझं आवडतं झाड. काळाघोडातल्या रिदम हाऊस जवळाचा पेल्टोफ़ोरम आपला जिगरी यार’ए!
श्रद्धा आहेस कुठे तू ?? वंटास झाली होतीस
ReplyDelete...आडीचं तसं काही मूळ नक्की असू शकतं
त्यावरून आठवलं शब्दकोशात अजून एक शब्द टाकायचाय ..
टेबल = "डेट"
कॉलनीतल्या एका मुलाचं गाव पाचगणी होत आणि गावाला गेला असताना त्याने तिकडे मुलगी पटवली आणि तो "डेम" बरोबर "टेबललॅन्ड" वर फिरायला जायचा ..आणि सुट्टी तून परत आल्यावर त्याने कॉलनीत "टेबललॅन्ड" चं "टेबल" रूढ केलं ... सेम 'आडी' सारखी थिअरी ..सही ना ?
वरती गच्चीवर अभी सावंत बरोबर घासलेलं बी. एस. सी. चं फिजिक्स...
ReplyDeleteआणि खाली पार्किंगमध्ये त्याचीच वयाच्या सव्वीसाव्या वर्षी निघालेली अंत्ययात्रा!
:(
तू हे लिहून जमाना झाला आणि आत्ता वाचतोय हे मी... और लिख्खो, लिखते रहो.