मार्शलची गाडी जस्ट वळणापलीकडे असल्याने त्याला आम्ही दिसणार नव्हतो आणि बाकी सामसूमच होती.
"बारुआ भडवे तूच असणार मला वाटलंच होतं..."
अल्फाज चिडून बोलला.
त्या बारुआनं अल्फाजच्या कानावर हलकेच दस्ता मारला आणि अल्फाजच्या कानशीलातून बारीक रक्ताचा ओघळ यायला लागला.
बारुआ आणि त्याच्या साथीदारानी आम्हाला ढकलत ढकलत टॅक्सीकडे नेलं आणि आत बसवलं:
अल्फाज ड्रायव्हिंग सीटवर, त्याच्या बाजूला मला कोंबला
पाठच्या सीटवर बारुआ आमच्यावर पिस्तूल रोखून बसला आणि त्याच्या साथीदारानं झटपट काम चालू केलं:
ड्रायव्हर सीटच्या पाठच्या चोरकप्प्यातून एक छोटासा *रासबेरी पाय* सारखा दिसणारा प्रोसेसर काढला.
"बॉस रूट पासवर्ड लागेल", तो म्हणाला.
"चल सांग लवकर नाहीतर तुझ्या या निष्पाप गोंडस पॅसेंजरला ठोकावं लागेल मला... काल तुझी सॉरी आय मीन आपली सगळी टीम ठोकली तसं.", बारूआनी पिस्तूल माझ्याकडे रोखलं.
मला 'शू'ची भावना व्हायला लागली होती... जोरात.
"त्याला जाऊ दे बारुआ, त्याचा काही संबंध नाही याच्यात, पासवर्ड देतो मी तुला"
"संबंध नाही कसा? तू त्यालापण वापरून घेतलास आज ते सांगितलंस का? एनीवेज त्याला सोडू आपण पासवर्ड दे."
"बॉस दोन पासवर्ड आहेत इनफॅक्ट...
प्रोसेसर क्लीन रिबूट झाल्यावर फॉरमॅटिंगच्या आधी दुसरा पासवर्ड मागेल पण पाच मिनटं लागतील त्याला."
"ठीक आहे अंजा, मग पाच मिनटं थांबू दे पॅसेंजरला, दुसरा पासवर्ड द्यायच्या आधी सोडूया त्याला प्रॉमिस!
अल्फाज मियाँ सांगा पहिला पासवर्ड पटापट"
"राखी१२०४" अल्फाज उत्तरला, आणि बारुआ खदखदून हसायला लागला.
"च्यायला माझ्या बायकोचं नाव आणि बड्डे, आय शुड हॅव गेस्ड! श्या!
आणि हो बाय द वे... तिनी डिप्रेशननी सुईसाईड नाय केली... मी मारली तिला."
"आमच्यात एकदाच तसं काही झालं होतं रे, आणि तुला मी सांगितलंही होतं, तुझी माफीपण मागितली होती मी, तू माफही केलं होतंस.", अल्फाज तळतळून बोलला.
"तू माझ्या बायकोबरोबर झोपणार आणि मी तुला माफ करणार? घंटा मेरा... सगळं नाटक होतं ते. कारण मला शेवटपर्यंत तुझा सी. टी. ओ. म्हणून रहायचं होतं. तुझ्या ह्या अप्रतिम प्रॉजेक्टसाठी!
आणि बाय द वे ते ड्रायव्हरलेस कार्सबिर्स चुत्यापा आहे सगळा, आय डोन्ट बिलिव्ह इट.
तू लाडात टॅक्सी घेऊन डेटा गोळा करत फिरणार आणि आम्ही मागेमागे बॅकअप कार मध्ये चुत्यासारखं फिरायचं? तू काय स्वतःला मुंबईच्या रस्त्यांवर रनिंग करणारा अनिल अंबानी समजतो काय रे?
बुलशीट!
मी तुझ्याबरोबर फक्त प्रोसेसरसाठी होतो.
तुझा हा प्रोसेसर जगातल्या फास्टेस्ट प्रोसेसरच्या वीसपट फास्ट झालाय आत्तापासून हे माहितीय का तुला वेड्या?"
"आणि तू तो *बिटकॉइन मायनिंग*साठी वापरणार आहेस!", अल्फाजला उलगडलं.
"एक्झॅक्टली. अफाट पैसा त्यातच आहे.
आणि काल आपली बाकीची टीम ठोकली मी तेव्हा मुद्दामूनच तुला पळायला दिलं मी...
तुला काय वाटलं रे काल त्या गोळ्या अशाच तुझ्या आजूबाजूला लागल्या?
आम्हाला तू शेवटच्या दिवशी जिवंत आणि जास्तीत जास्त स्ट्रेस्ड हवा होतास.
कॉर्टिसॉल लेव्हल जितकी हाय तितका तुझा मेंदू आणि प्रोसेसर पीक परफॉर्मन्स देईल...
आठवतंय आपणच टेस्ट केल्या होत्या त्या?
शिवाय बाकी सगळी टीम मेली तरी हवाय तसा तुझा फायनल पॅसेंजर शोधत तू फिरणार...
ह्याची मला शंभर टक्के खात्री होती.
इतकी वर्षं मित्र होतो आपण चांगला ओळखतो तुला मी.
म्हणूनच कालपासून मॉनिटर करतोय तुला आम्ही बॅकअप कारमधला ट्रॅकर घेऊन.
तुझ्या प्रोसेसरनं पीक परफॉर्मन्स गाठायची वाट पहात."
"झालं बॉस आता कर्नल लेव्हल पासवर्ड लागेल", अंजा म्हणाला.
"आधी पॅसेंजरला जाऊ दे", अल्फाज
"आधी पासवर्ड", बारुआ
मला पाठी वळता येत नव्हतं पण मी उजव्या डोळ्याच्या कोपऱ्यातून बघितलं..,
दोघंही एकमेकांकडे रोखून बघत राहिले काही क्षण...
मी इतका वेळ पुढेच बघत होतो..
समोरून जब्बार ट्रॅव्हल्सची मोठ्ठी व्होल्व्हो येत होती...
हेडलाईट हायबीमवर ...
(ते आपल्याकडे सगळ्याच गाड्यांचे असतात.)
पुढच्या २ सेकंदांत ती आम्हाला पास होणार...

क्रमश:
भन्नाट...
ReplyDeleteथँक्स प्राची :)
Delete