आम्ही मार्शलचं बिल देऊन पंक्चरवाल्याकडे आलो.
पंक्चर निघालंच होतं...
पंक्चरवाला पैसे घेऊन पुन्हा पांघरूण ओढून एका मिनटात गुडुप्प झोपून गेला...
आम्ही गाडीजवळ आलो... आणि अचानक अल्फाजच्या मानेजवळ एक शेंदरी दिवा लुकलुकला.
"चल जायला हवं लवकर गाडीत...
मी टॅक्सीशी फक्त एक तास डिस्कनेक्टेड राहू शकतो.. बॅकअप बॅटरीवर.
माझ्या हायब्रीड मेंदूचं चार्जिंग फक्त गाडीतूनच होऊ शकतं किंवा आमच्या बेस सेंटरच्या स्पेशल चार्जरमधून."
आणि ऑलरेडी ४५ मिनटं बॅकअपवर आहे मी.
"आणि एक तासापेक्षा जास्त डिस्कनेक्टेड राहिलास तर?"
"मग मात्र माझा मेंदू पॉवर सेव्हिंग मोडमध्ये जाईल:
पुढचा अर्धा तास मला दिसायचं बंद होईल, कारण आपली ऑप्टिक्स फंक्शन्स खूप जास्त बॅटरी खातात...
मी जवळ जवळ कोमात जाईन...
आणि त्यानंतरही नाही जोडलं चार्जरला तर मात्र खेळ खल्लास!
पण तशीही आजची शेवटची रात्र आहे ही सगळी कन्स्ट्रेन्ट्स सांभाळायची...
कारण आम्हाला हवा होता तो सगळा डेटा आता मिळालाय आणि माझा मेंदू आणि गाडीचा प्रोसेसर दोन्ही हायेस्ट परफॉर्मन्सला पोचलेयत... थँक्स टू यू !
शिवाय हा सगळा आर्टिफिशियल जुगाड सस्टेनेबल नाहीये...
पीक परफॉर्मन्स अचिव्ह झाला की २४ तासांनंतर माझ्या ब्रेनसेल्स प्रचंड वेगानी नष्ट होतील... आणि तसाही मी मरेनच.
सो... तूला सोडलं की नॅशनल पार्क जवळच्या कुठल्यातरी निवांत रस्त्यावर टॅक्सी लावून स्वतःला अनप्लग करेन, आणि झोपून जाईन शांतपणे कायमचा!
पण माझं एक शेवटचं काम करशील?
माझा क्लाउड ड्राईव्हचा पासवर्ड इलॉन मस्कपर्यंत पोचवायची व्यवस्था करशील?
मीच केलं असतं खरं तर पण मला त्यानं ब्लॉक करून टाकलंय आमच्या भांडणानंतर."
मला काही कळेना,
"मीच का पण? तुझी ती टीम कुठे गेली?"
मी गोंधळून विचारलं.
"मी सांगतो ते", पाठून आवाज आला...
आणि आमच्या दोघांच्याही पाठीत कोल्टच्या गारेगार नळ्या घुसल्या.
क्रमश:

No comments:
Post a Comment